बीड

पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Oct :- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांनी स्वतः ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली आहे. पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडल्याने कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली जात आहे.

अनेकांनी सोशल मीडियावर त्यांची प्रकृती लवकर ठिक व्हावि यासाठी प्रार्थना केली आहे. ट्वीट करत पंकजा मुंडे म्हणाल्या की, दोन चार दिवस आराम करणार आहे. फोन कॉल घेणंही शक्य नाही. बरं वाटत नसल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्या कोणालाही भेटू शकणार नाहीत आणि आराम करणार असल्याचं ट्वीट त्यांनी केलं आहे.