क्राईम

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

येवला:- अमोल गणपत जाधव या २१ वर्षीय तरुणाने लग्न जमत नसल्याच्या कारणाने सवतःची जीवनयात्रा संपवली.अमोल जाधव हा अंदरसूल तालुका येवला येथे राहणारा होता.स्वतः मोबाईल शॉपीचा मालक-चालक होता . अमोल स्वहिमतीने स्वतःच्या पायावर उभा राहिल्याने घरच्यांनी अमोलच्या लग्नासाठी वधू संशोधनाचा कार्यक्रम सुरु केला केला. अमोलसाठी अनेक ठिकाणी वधू संशोधन करत असताना प्रत्येक मुलीच्या वडीलांकडून नौकरदार मुलगा हवा असल्याची मागणी येऊ लागली त्यामुळे अमोलचे लग्न जमणे शक्य होत नव्हते याच गोष्टीला वैतागून अमोलने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि अमोलचा मृतदेह ताब्यात घेतला.पोलिसांनी अमोलचा मूर्तदेव शवविच्छेदाना करीता पाठवला आहे.अचानक घडलेल्या या घटनेने सभोतालील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.