बीड

कोव्हीड काळात शिक्षकांनी केलेले कार्य अतुलनीय- रो.हरीश मोटवाणी

30 Sept :- कोव्हीड संकटात शिक्षकांनी ऑनलाईन ज्ञानदान तर केलेच पण आरोग्य सेवा कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेऊन जी राष्ट्रसेवा केली ती अतुलनीय आहे. शैक्षणिक कार्य अखंड आणि अव्याहत सुरू ठेऊन शिक्षकांनी समोर नसतांनाही विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अत्यावश्यक प्रवाहाशी संलग्न ठेऊन ज्ञानार्जनात खंड पडू दिला नाही याची समाज सदैव जाणीव ठेवेल असे प्रतिपादन रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल रो.हरीश मोटवाणी यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ बीड सिटीच्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या राष्ट्र शिल्पकार या आदर्श शिक्षकांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे वितरण बुधवार दि 29 सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्तेकरण्यात आले तेव्हा ते बोलत होते. येथील हॉटेल यशराज इनमध्ये सहाय्यक प्रांतपाल रो.अक्षय शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

आपल्या सविस्तर भाषणात रो.,मोटवाणी यांनी रोटरीने आरोग्य,शिक्षण आणि अन्य सामाजिक क्षेत्रात चालू असलेल्या कार्याची माहिती देऊन आगामी काळात शिक्षकांकडूनच्या अपेक्षा अधिक वाढल्याचे सांगितले.

यावेळी पुरस्कारप्राप्त शिक्षक सुदर्शन धुतेकर ( धुतेकर संगीत विद्यालय, बीड) दिलीप जायभाये (बारगजवाडी),सतीश सुलाखे (राजस्थानी विद्यालय,बीड), सविता कदम (प्रभातकार विद्यालय,बीड) सतीश म्हेत्रे (शिरापूर गात ),चंद्रशेखर बडे (मूकबधिर विद्यालय),सविता गंधे (ट्विंकल स्टार स्कुल), निलेश चव्हाण ( देवळा ), शारदा जोशी (पवारवाडी ),अनिता जोगदंड ( तळेगाव ),वनिता लातूरकर ( हिंगणी हवेली),रामनाथ बारस्कर (आनंदगाव ), सुरेश काशीद (खोकरमोहा ), राखी सचदेव ( ट्विंकल स्टार स्कुल,बीड ) बंडू मतकर (शिवाजी विद्यालय,बीड ),
सुवर्णा काळे ( चंपावती इंग्लिश स्कुल,बीड ) सुरेखा गोरे (शिदोड ) आणि श्रीहरी येडे (देवळा ) यांना शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सहाय्यक उपप्रांतपाल रो.अक्षय शेटे यांनीही मार्गदर्शन केले. प्रस्ताविक रोटरी क्लब ऑफ बीड सिटीचे अध्यक्ष रो.प्रदीप शेटे यांनी केले तर आभार सचिव रो.संध्या मिश्रा यांनी मानले. क्लब ट्रेनर रो.ईश्वर मुथा, प्रोजेक्ट चेअरमन रो.सुदर्शन हेरकर,रो.सचिन लातूरकर,रो.सुजित सूर्यवंशी, रो.प्रशांत निनाळ ,रो.दीपक कर्णावट, रो.सुदर्शन हेरकर ,रो.गणेश मैड यांचा सत्कार करण्यात आला.

पुरस्कारप्राप्त शिक्षक बंडू मतकर,राखी सचदेव आणि श्रीहरी येडे यांनी मनोगत व्यक्त केली तर सतीश सुलाखे यांनी पसायदान सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.सुप्रिया वीर आणि रो.राजेश देशमुख यांनी केले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समोरप करण्यात आला. कार्यक्रमास नागरिक कोव्हीड नियमांचे पालन करून उपस्थित होते.