बीड

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचे नागरिकांना आवाहन

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Sept :- बीड जिल्हयात होत असलेल्या अतिवृष्टी मुळे विविध ठिकाणी आणि नदीकाठच्या गावात पुराच्या पाण्याचा धोका वाढला आहे. या भागातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

बीड जिल्हयात 11 तालुक्यात नैसर्गिक आपत्ती मधील आपत्ती व्यवस्थापन निवारणार्थ जिल्हाधिकारी बीड येथील कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वीत केलेला आहे. त्याचा संपर्क क्र 02442-222604 असा असून मदतीसाठी जनतेने कृपया या क्रमांकाशी संपर्क साधावा.

आपल्या सभोवताली निर्माण झालेल्या पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास तसेच नदीकाठी राहणाऱ्या जनतेने सतर्क राहावे आणि पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास वरील क्रमाकांशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.