महाराष्ट्र

तोंडात बोळा कोंबून महिलेवर बलात्कार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Sept :- देशाला हादरवून सोडणारी मुंबईतील साकीनाका येथील घटना ताजी असताना, डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी अत्याचाराचा कळस गाठला आहे.या घटना ताज्या असताना, नाशिक शहरात महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे. येथील एका व्यावसायिक महिलेवर नराधमाने तोंडात बोळा कोंबून आणि तिचे हात बांधून अत्याचार केला आहे. नराधम आरोपी हा सराईत गुन्हेगार असून नाशिक पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

संबंधित संतापजनक घटना नाशिक शहरातील पवननगर भागात घडली आहे. पीडित महिलेचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय असून सराईत गुन्हेगारानं चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला आहे. पीडित महिला आपल्या पार्लरमध्ये देवाची पूजा करीत असताना, संशयित आरोपी तिच्या दुकानात शिरला.

यानंतर आरोपीनं पार्लरचा दरवाजा आतून बंद करून चाकूचा धाक दाखवत तिच्यासोबत जबरदस्ती केली आहे. नराधमाने पीडित महिलेच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हात बांधत अमानुष पद्धतीने तिच्यावर अत्याचार केला आहे.