भीषण आगीत दुकाने जळून खाक
28 Sept :- गेवराई शहरातील कोल्हेर वेसीच्या लगत असलेल्या सोनार लाईनमधील दुकानांना रात्री 2 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक तसेच दोन सोनाराच्या दुकानांचा समावेश आहे. अचानक लागलेल्या आगीने पाहता-पाहता आगिने रौद्ररूप धारण केले होते.
घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र दुकानातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. जवळपास 30 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
गेवराई शहरातील कोल्हेर वेशीच्या आतमध्ये सोनार लाईन आहे. यामध्ये शिवाजी दहिवाळ, टाक यांचे सोन्याचे दुकान आहे, तर मडकर यांचे इलेक्ट्रॉनिक्सचे मोठे नुकसान झाले. दरम्यान रात्री 2 वाजण्याच्या सुमारास येथील एका दुकानामध्ये अचानक लाग लागली.
पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण करत शेजारच्या दोन दुकाना देखील आगीच्या भक्ष्यस्थानी घेतल्या. आग लागल्याचे लक्षात येताच जवळपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. तसेच येथील नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या वतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. यामुळे आसपासचे अनेक दुकानाला झळ पोहचली नाही.
दरम्यान या घटनेत दुकानातील सर्व वस्तू, माल जळून खाक झाल्या आहेत. या घटनेतील मडकर यांचे इलेक्ट्रॉनिक दुकानाचे जवळपास 15 लाखांहून अधिक नुकसान झाले असल्याचे सांगितले जात असून एकूण तीन्ही दुकानाचे मिळून 30 लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.