महाराष्ट्र

महाराष्ट्राला अतिमुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ 8 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 Sept :- चक्रीवादळामुळे ४० किमी प्रतितास वेगाने वारे सुटणार असल्याचंही हवामान विभागाने म्हटलं आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मुंबई, पुणे ठाण्यासह महाराष्ट्राला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर कायम राहणार असून, आठ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं गुलाब चक्रीवादळाने भारताच्या किनारपट्टीवर रविवारी रात्री पाऊल ठेवलं. त्यानंतर सोमवारी वादळाची तीव्रता कमी होऊन कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम पुढील दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रावर दिसून येणार आहे. आज विदर्भ, मराठवाड्यात ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून, मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

उद्या (२८ सप्टेंबर) मुंबई, ठाणे, पुणे या शहरांसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर रेड आणि ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे.


उद्या (२८ सप्टेंबर) मुंबई, ठाणे, पुणे या शहरांसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर रेड आणि ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे.


गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, २८ सप्टेंबरला
ठाणे,
पालघर,
रायगड,
रत्नागिरी,
नाशिक,
धुळे,
जळगाव
या जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई,
पुणे,
सिंधुदुर्ग,
अहमदनगर,
औरंगाबाद,
बीड,
जालना,
परभणी,
हिंगोली,
नंदुरबार
या जिल्ह्यांना ऑरेंज अर्लटचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर,
सातारा,
सांगली,
सोलापूर,
लातूर,
उस्मानाबाद,
नांदेड,
वाशिम,
बुलढाणा,
अकोला,
अमरावती
या जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.