News

उद्यापासून ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना सुरु होणार

देशातील गरिबांना दिलासा देण्यासाठी उद्यापासून ‘एक देश, एक रेशन कार्ड योजना राबवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून होईल. या योजने अंतर्गत रेशनकार्डचा लाभ देशात कुठुनही घेता येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक पॅकेज जाहीर करताना याचा उल्लेख केला होता केंद्र सरकारच्या या योजनेचा ६७ कोटी लोकांना फायदा होईल.

सध्या ज्या जिल्ह्यात रेशनकार्ड बनलेलं आहे त्याच जिल्ह्यात तुम्हाला रेशन मिळ शकेल. दसरीकडे तम्ही जिल्हा बदलल्यास तम्हाला लाभ मिळत नाही. एक देश, एक रेशन कार्ड अस्तित्त्वात आल्यानंतर, दारिद्र्य रेषेखालील लोक स्वस्त किमतीत देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात रेशन खरेदी करू शकतात.

अशी होणार लाभाध्च्याची ओळख

या सरकारी योजनेंतर्गत पीडीएसच्या लाभार्थीना त्यांच्या आधार कार्डवर इलेक्ट्रॉनिक पॉईट ऑफ सेल (पीओएस) ने ओळखलं जाईल ही योजना देशात राबविण्यासाठी सर्व पीडीएस दुकानांवर पीओएस मशीन्स बसवण्यात येतील. राज्यांनी सर्व पीडीएस दुकानांवर पीओएस मशीनचा अहवाल नोंदवताच त्यांना ‘एक देश, एक रेशन कार्ड योजनेत समाविष्ट केले जाईल.

उद्यापासून रेल्वेच्या २०० नव्या गाड्या धावणार, प्रवासापूर्वी रेल्वेचे हे नियम जाणून केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत लाभार्थी देशातील कोणत्याही भागात कोणत्याही रेशन डीलरकडून त्यांच्या का्डवर रेशन घेऊ शकतात. लाभाध्थ्याना त्यांचे जुने रेशन कार्ड रद्द लागणार नाही आणि जुन्या काईच्या जागी नवीन शिधापत्रिका घ्यावी लागेल. आपण भारताचे नागरिक असल्यास आपण या रेशनकार्डसाठी अर्ज करू शकता. १८ वर्षाखालील मुलांना पालकांच्या रेशनकार्डमध्ये जोडलं जाईल.

रेशनकार्डधारकांना तीन रुपये प्रतिकिलो दराने पाच किलो तांदूळ आणिदोन रुपये प्रतिकिलो दराने गहू मिळणार आहे. स्थानिक भाषा आणि हिंदी किंवा इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये है काई दिलं जाईल.’

३० सप्टेंबरपर्यंत आधार कार्डवस्न लिंक कराव लागणार रेशन काईला आधारशी जोडण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे. या संदर्भात केंद्रीय अन्न मंत्रालयाने असं म्हटले आहे की रेशनकार्डधारकांना आधारशी जोडले गेलेलं नसलं तरी रेशन मिळणार आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना असे निर्देश देण्यात आले आहेत की कोणत्याही लाभार्थ्याला त्यांच्या वाट्याचे रेशन नाकारू नये.