बीड

बीडमध्ये खळबळ; तरुणीचा मृतदेह आढळला विहिरीत

26 Sept:- गेल्या काही दिवसांपासून हत्या-आत्महत्या तर अपघाताच्या बातम्या वारंवार समोर येऊ लागल्या आहे. एका १५ वर्षीय मुलीचा मृतदेह आज सकाळी चहाटा फाटा परिसरातील विहिरीत आढळून आल्याने बीडमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बीड शहरातील चाटा फाटा येथील समरीन इकबाल मनियार (वय१५) ही आज घरातून कोणालाही न सांगता गेले होती. त्यानंतर कुटुंबियांनी शोधाशोध केली असता एका विहिरीजवळ तिची चप्पल आढळून आली. ग्रामस्थांच्या मदतीने तिचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात नोंद झाली आहे.