देश विदेश

पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 Sept :- अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशवाद पसरवण्याासाठी होऊ नये. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांनी विचार करावा, कारण दहशतवादाचा फटका त्यांना देखील बसू शकतो संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचं नाव न घेता पाकिस्तानला इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.भारताने जगातील गरजू देशांना लस देण्यास सुरुवात केली आहे. आम्ही जगातील लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आमंत्रित करत आहे. आमच्या देशात या आणि लस निर्मिती करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी केले आहे. भारतात कोविन अॅपवर दिवसाला तीन कोटी लोकांच्या लसीकरणाची नोंद होते.

भारताने जगातील पहिली डीएनए आधारित लस तयार केली आहे. 12 वर्षापुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लस भारताने विकसीत केली आहे. आत्मनिर्भर भारत अभियान कोरोना संकटात अर्थव्यवस्थेला बळकटी देणारं अभियान आहे. भारतातील सशक्त लोकाशाहीमुळे एक चहा विकणारा चौथ्यांदा भाषण देत आहे. भारतातील विविधता ही भारताची ताकद आहे भारत विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे.

भारताची विविधता त्याच्या लोकशाहीचा पुरावा आहे. देशवासियांची सेवा करताना मी 20 वर्षे पूर्ण केली आहेत. मी आधी मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान म्हणून लोकांची सेवा करत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.अफगाणिस्तानमधील अल्पसंख्याकांना मदत झाली पाहिजे. अनेक देशात कट्टरतावाद वाढतोय असे देखील मोदी या वेळी म्हणाले.