रामकृष्ण ‘मूळव्याध’ हॉस्पिटलच्या वतीने ‘मोफत शिबिराचे’ आयोजन
बीड, 25 सप्टेंबर :- अल्पावधीतच बीड शहरात नावारूपाला आलेल्या डॉ. कृष्णा एस. शिंदे यांच्या ‘रामकृष्ण मूळव्याध हॉस्पिटल इंजेक्शन व लेसर सेंटर’ च्या वतीने मूळव्याध ग्रस्थांसाठी भव्य दिव्य मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे तपासणी शिबीर तीन दिवसीय असून येत्या दि. 25 सप्टेंबरपासून ते 27 सप्टेंबरपर्यंत परिधान ड्रेसेसच्या समोर प्रकाश हाईटस पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या वर सुभाष रोड बीड येथे घेण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शिबीराची वेळ सकाळी 10 ते सायं. 7 पर्यंत ठेवण्यात आली आहे.
या शिबिराच्या माध्यमातून संडासवाटे रक्त जाणे, कोंब लागणे, पोट साफ न होणे, शौचजागी सुज येणे/पु येणे व फुटणे, कडक संडास होणे, चुंबळ बाहेर येणे, शौचाच्या वेळी आग होणे सुई टोचल्यासारखे दुखणे रुग्णांना होणाऱ्या या त्रासांबाबतचे मोफत तपासणी व निदान करण्यात येणार आहे. तर या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या रुग्नांना शस्त्रक्रियेसाठी आणि उपचारांमध्ये काही प्रमाणात सवलत देखील देण्यात येणार आहे.
या शिबिरात अत्याधुनिक (Lasotronix1470 ) लेसर व शल्या (Vessal Sealar) या मशिनव्दारे तसेच आयुर्वेदीक क्षारसुत्र पध्दतीने केली जाईल. शिबीरातील रुग्नांची शस्त्रक्रिया माफक दरात केली जाणार असून रुगांना ऍडमिट राहण्याची गरज नाही. सुसज्ज ऑपरेशन थिएटरचि सुविधा उपलब्ध असणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी स्वतंत्र महिला डॉक्टर देखील उपलब्ध असणार आहे.
रुग्णांनी जास्तीत-जास्त संख्येने ‘रामकृष्ण मूळव्याध हॉस्पिटल इंजेक्शन व लेसर सेंटर’ च्या वतीने घेण्यात येणाऱ्या या शिबिरात सहभागी होऊन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. कृष्णा एस. शिंदे एम.एस. (आयु.) (फेलोशिप इन प्रोक्टोलॉजी, हैद्राबाद) यांनी केले आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी रुग्णांनी ०२४४२- २९९२३९ /८४११८८९९९९ / ७०२०६६४०३३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपली नावाच्या नोंदणी करावी.