बीड

माजी तालुका कृषी अधिकारी बाबासाहेब डाके यांचे दुःखद निधन

बीड, 25 सप्टें :- बीड शहरातील आदर्श नगर डी.पी. रोड येथील रहिवासी असलेले माजी तालुका कृषी अधिकारी बाबासाहेब संतोबा डाके यांचे काल शुक्रवारी दि. 24 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. निधनासमयी ते 79 वर्षांचे होते. त्यांच्य निधनाने बीडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

बाबासाहेब डाके यांनी सब डिस्को म्हणून यशस्वीपणे कार्य पाडले. सामाजिक तसेच धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी उस्फुर्त सहभाग असायचा. मिशिकिल, प्रेमळ स्वभावच व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वत्र त्यांची विशेष ओळख होती. डाके यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती ठीक नव्हती म्हणून त्यांच्यावर बीड येथील कृष्णा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या प्रकृतीने उपचारार्थ साथ न दिल्याने शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांचा अंत्यविधी काल शुक्रवारी दि. 24 सप्टेंबर रोजी सायं 5 वाजता बीड शहरातील मोंढ्यातील अमरधाम स्मशानभूमीत करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, मुलगा, सूना, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. बाबासाहेब डाके यांच्या निधनाने डाके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या या दुःखात झुंजार नेता परिवार सहभागी आहे.