बीड

सौताड्याच्या धबधब्यावरून उडी मारून आत्महत्या

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Sept :- पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील श्रीक्षेत्र रामेश्वरच्या धबधब्यावरून उडी मारून नगर जिल्ह्यातील एका ग्रामसेवकाने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी ५ वाजता घडली. झुंबर मारुती गवांदे (वय ५०) असे त्या ग्रामसेवकाचे नाव आहे. झुंबर गवांदे हे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील पंचायत समितीत ग्रामसेवक होते असे त्यांच्याजवळ आढळून आलेल्या ओळखपत्रातून समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलीस स्टेशनचे पी आय. पाटील व सौताडा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, झुंबर गवांदे यांनी आत्महत्या कुठल्या कारणास्तव केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.