कपिल शर्मावर एफआयआर दाखल!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
24 Sept :- सर्वांना खळखळून हसवणारा कॉमेडियन कपिल शर्मा अडचणीत आला आहे. ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये दाखवण्यात आलेल्या एका दृश्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या वादग्रस्त दृश्याप्रकरणी त्याच्यावर मध्यप्रदेशमधील शिवपुरी येथे एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
सोनी टीव्हीवर येणारा ‘द कपिल शर्मा शो’ खूपच लोकप्रिय आहे. कपिल शर्मा आणि त्याची टीम आपल्या विनोदांनी लोकांना हसवण्याचे काम करतात. मात्र या शो मध्ये दाखवण्यात आलेल्या एका दृश्यामुळे तो अडचणीत आला आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये न्यायालयाचा सेट उभारण्यात आला होता. यात कपिल शर्मा हातात दारुचा ग्लास घेऊन आपले पात्र साकारत होता. यामुळे न्यायालयाचा अपमान झाल्याची तक्रार त्याच्याविरोधात दाखल करण्यात आली आहे. मध्यप्रदेशमधील शिवपुरी येथील एका वकिलाने कपिल शर्मा याच्याविरोधात सीजीएम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणावर 1 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
सोनी टीव्हीवरुन प्रसारित होणारा कपिल शर्मा शो खूपच गचाळ आहे. या शोमध्ये ते महिलांबाबतही अश्लील टिप्पणी करत असतात. एका एपिसोडममध्ये स्टेजवर न्यायालय उभारण्यात आले होते आणि कलाकार दारु पिताना दाखवण्यात आले होते. हा न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळे कलम 356/3 अंतर्गत दोषींवर एफआआर नोंदवण्याची मागणी केली आहे, असे तक्रारदार वकिलाने म्हटले.
दरम्यान, हे प्रकरणी गेल्या वर्षीचे आहे. 19 जानेवारी 2020 ला हा एपिसोड प्रसारित झाला होता आणि 24 एप्रिल 2021 ला या एपिसोडचे पुर्नप्रसारण करण्यात आले होते. या एपिसोडमध्ये न्यायालयात एक पात्र दारुच्या अंमलाखाली असल्याचे दाखवण्यात आले होते. यामुळे न्यायालयीन कार्याची बदनामी झाल्याचा दावा वकिलाने केला आहे.