बीड

बीड- मांजरा धरणाचे उघडले १२ दरवाजे

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Sept :- बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठा आधार असलेल्या मांजरा धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले. असून रात्री झालेल्या पावसामुळे मांजरा धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. दोन दिवसांपुर्वी मांजरा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले होते, आता मात्र पाण्याची आवक वाढल्याने १८ पैकी १२ दरवाजे उघडण्यात आले असून गेल्या अनेक वर्षांपासून प्रथमच धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहे.

दरम्यान मांजरा धरण पूर्णत: भरल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदीला मोठा पुर आलेला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील तडोळा येथील राम बाबासाहेब कदम हे शेतकरी सोयाबीन काढण्यासाठी आपल्या शेतामध्ये गेले होते. ते शेतातून जात असताना वाहून गेल्याचे सांगण्यात आले. त्यांचा शोध सध्या सुरू आहे.