“या” तारखे पासून शाळा सुरु
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
२४ सप्टेंबर | कोरोना नियमांचे पालन करुन राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळणार आहे.
मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून राज्यातील सर्व शाळा बंद होत्या. पहिली लाट ओसरल्यानंतर काही इयत्ता, वर्ग सुरु झाले होते. पण दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा वर्ग बंद झाले होते. दरम्यान, बहुतांश ठिकाणी लसीकरण झाले आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचे लसीकरण झालेले आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.जिल्हानिहाय कोरोनाची स्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय होईल, असे सांगितले जात आहे. कोणत्या वर्गांच्या शाळा सुरु होणार यासंदर्भात अद्याप सविस्तर माहिती समोर आली नाही.
4 ऑक्टोबरपासून शाळा उघडण्याचा निर्णय हा नक्कीच स्वागतार्ह आहे. तिसऱ्या लाटेच्या संभाव्य भीतीमुळे सरकारने घेतलेला निर्णय मागे घेतला होता. परंतु गणेशोत्सव होऊनही धोका जाणवत नाही पासपोर्टचा तो निर्णय कसा वादग्रस्त ठरला होता परंतु हरकत नाही. दिवाळीनंतर शाळा उघडण्यापेक्षा अगोदरच सरकार शाळा उघडते आहे. ही स्वागतार्ह गोष्ट आहे.
१५ जूनपासून आतापर्यंत दिवस जरी गेले तरी सुट्ट्या कमी करून हे संपूर्ण शैक्षणिक वर्ष हातात मिळू शकते. ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या मुळे शाळा उघडणे इतकाच पर्याय आज आपल्या समोर होता आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त झालेले बालविवाह, शाळाबाह्य मुलांची वाढती संख्या, शाळा नाही तर मग कामाला जा असे म्हणून ठिकठिकाणी बालमजुरीला लागलेली मुले, मोठ्या प्रमाणावर झालेले स्थलांतर, यातून भीषण सामाजिक परिणाम मुलांवर होत होते. त्यामुळे शाळेच्या प्रवाहात मुलांना टिकवणे म्हणजे बालमजुरी रोखणे शाळेत मुले आणणे म्हणजे शालाबाह्य होण्यापासून रोखणे व मुलगी शाळेत आणणे म्हणजे तिला बालविवाह पासून रोखणे हाच एकमेव कार्यक्रम आता करावा लागेल आणि त्यामध्ये या निर्णयाचे नक्कीच स्वागत आहे. दरम्यान लहान मुलांची शाळा उघडताना मग आता महाविद्यालयांचे काय? ते अगोदर उघडली पाहिजे, असा सवालही हेरंब कुलकर्णी यांनी केला.