मोदी यांना मोठा धक्का
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
२३ सप्टेंबर | अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन यांनी मिळून स्थापन केलेल्या आघाडीमध्ये (ऑकस) भारत किंवा जपानचा समावेश होण्याची शक्यता अमेरिकेने आज फेटाळून लावली. भारत-प्रशांत महासागर प्रदेशातील आव्हानांचा सामना करण्यासाठी गेल्याच आठवड्यात ‘ऑकस’ची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत ऑस्ट्रेलियाला प्रथमच अण्वस्त्रक्षम पाणबुडी मिळणार आहे. या आघाडीबाबत फ्रान्सनेही नाराजी व्यक्त केली होती. आता या प्रदेशातील भारत आणि जपान या दोन महत्त्वाच्या देशांच्या सहभागाबाबत चर्चा सुरु झाल्याने ‘व्हाइट हाऊस’च्या माध्यम सचिव जेन साकी यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे. ‘या गटात आणखी कोणत्याही देशाचा समावेश होणार नाही. हे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनाही कळविण्यात आला होता,’ असे साकी यांनी सांगितले.
दरम्यान, क्वाड परिषद, ज्यो बायडेन यांच्याबरोबर चर्चा आणि आमसभेतील भाषण यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अमेरिकेत दाखल झाले. अमेरिकेचे भारतातील राजदूत तरनजितसिंग संधू आणि बायडेन प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मोदी यांचे स्वागत केले. सकाळपासून येथे जोरदार पाऊस असूनही शेकडो भारतीय लोक मोदींचे स्वागत करण्यासाठी विमानतळाबाहेर उभे होते. त्यांच्या हॉटेलबाहेरही भारतीयांनी गर्दी केली होती. मोदींनी त्यांच्याजवळ जात त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला. भारतीय समुदायाने जगभरात आपले विशिष्ट स्थान निर्माण केले आहे, असे कौतुक मोदींनी नंतर ट्विटरवर केले. २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून मोदी यांचा हा सातवा अमेरिका दौरा आहे.