‘त्या’ कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील स्वॅब २ जूनला घेणार.
किल्लेधारुर येथील ‘त्या’ कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील स्वॅब २ जूनला घेणार.
किल्लेधारूर दि.३१(प्रतिनिधी) शहरातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील हाय रिस्क असणाऱ्या व्यक्तींचे स्वॅब मंगळवारी (दि.२) जून रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
दि.२८ रोजी शहरात एक कोरोना बाधित आढळून आला. यामुळे शहरात खळबळ उडाली होती. त्याच रात्री आरोग्य विभागाने बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सांयकाळ पर्यंत संपर्कात आलेल्या ५३ व्यक्तींचा शोध घेण्यात आरोग्य विभागाला यश आले. यातील ४० ते ४३ लोक जवळचे नातलग असून इतर बाहेरुन संपर्कात आलेले आहेत. या संपर्कात आलेल्या पैकी हाय रिस्क असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींचे सस्वॅब आयसीएमआरच्या निकषानुसार मंगळवारी दि.२ जून रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.चेतन आदमाने यांनी दिली.
त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संबंंधित लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.