छत कोसळल्यानं २७ विद्यार्थी जखमी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
२३ सप्टेंबर | हरयाणाच्या गनौर गावात एका प्राथमिक शाळेचं छत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये तिसरीच्या वर्गातील २७ विद्यार्थी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने जखमी झाले आहेत. त्याचबरोबर छतावर माती भरण्याचं काम करणारे तीन मजूरही ढिगाऱ्याखाली अडकल्याने जखमी झाले आहेत. यानंतर तात्काळ अडकलेल्या विद्यार्थ्यांसह मजूरांना बाहेर काढून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सात मुलांना रोहतक येथील पीजीआय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
गणौर गावाजवळील जीवानंद पब्लिक स्कूल या शाळेत गुरुवारी तिसरीच्या वर्गाची कच्च बांधकाम असलेल्या छतावर माती टाकण्यात येत होती. याचवेळी अचानक छत खाली कोसळलं. यामुळे या खोलीत अभ्यास करत असलेल्या २७ विद्यार्थी आणि छतावर काम करणारे मजूर जखमी झाले. या घटनेनंतर शाळेत एकच गोंधळ उडाला.
या गोंधळातच जखमी मुलांना सुरक्षितरित्या बाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये सात मुलांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामधील काही विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी खासगी रुग्णालयात दाखल केलं. यामध्ये २० विद्यार्थी आणि ३ मजुरांना प्राथमोपचार देण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.