असदुद्दीन ओवैसी यांच्या घराची तोडफोड
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
२१ सप्टेंबर | ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या घराची तोडफोड झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेले पाचही जण हे एका संघटनेशी संबंधीत कार्यकर्ते आहेत.
आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे असदुद्दीन ओवैसी. त्यांच्या अशाच एका वक्तव्याचा राग आल्याने हिंदु सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी ओवैसी यांच्या घराची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेची माहिती मिळताच काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही लोक ओवैसी यांच्या दिल्ली निवासस्थानाची तोडफोड करत असल्याचा फोन आल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.
फोन आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. कर्मचारी पोहचेपर्यंत त्यांनी त्यांच्या घराचे प्रवेशद्वाराचे आणि खिडक्यांचे नुकसान केले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.