Gang RapeNewsPopular NewsRecent NewsTrending Newsक्राईमभारत

प्रियकर वकील आणि डॉक्टर यांना बलात्कार प्रकरणात अटक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

२१ सप्टेंबर | महिलेवर बलात्कार करुन तिला ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणात गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील सायबर क्राइम पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांनी पीडीत महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवले होते. ते महिलेला ब्लॅकमेल करत होते. आरोपींमध्ये अहमदाबादमधील एका वकिलाचा आणि आनंद जिल्ह्यातील बोरसाद मधील एका डॉक्टरचा समावेश आहे.

पीडीत महिलेचे एका आरोपीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. पेशाने फोटोग्राफर असलेला हा आरोपी आनंद जिल्ह्याचा रहिवाशी आहे, पीडीत महिलेने तिच्या जबानीत पोलिसांना ही माहिती दिली. दीडवर्षांपूर्वी दोघांमध्ये वादावादीला सुरुवात झाली. आरोपीने महिलेकडे पैशांची मागणी सुरु केली.

महिला नंतर अहमदाबामधील एका वकिलाच्या संपर्कात आली. त्याने महिलेला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पण वकिलाने संधीचा फायदा उचलून हॉटेलच्या रुममध्ये महिलेवर बलात्कार केला. त्याच हॉटेलमध्ये आरोपी असलेला महिलेचा पहिला प्रियकर सुद्धा उपस्थित होता. हॉटेलच्या त्या रुममध्ये महिलेचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ बनवण्यात आले.

फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन दोघांनी अनेकदा माझ्यावर बलात्कार केला, असे पीडीत महिलेने पोलिसांसमोर सांगितले. या प्रकरणात तिसरा आरोपी डॉक्टर आहे. तो महिलेला बोरसाद येथील आरोग्य केंद्रात घेऊन गेला होता. त्यानंतर त्याने त्रास द्यायला सुरुवात केली. तिने डॉक्टरचा मोबाइल नंबर ब्लॉक केल्यानंतर त्याने तिला दुसऱ्या नंबरवरुन फोन आणि संदेश पाठवणं सुरु केलं. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींविरोधात कलम ३७६ डी, कलम ६७ आणि आयटी कायद्यातंर्गत गुन्हा नोंदवला आहे.