३ चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
२० सप्टेंबर | अहमदनगर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना समोर आली आहे. तीन चिमुकले शेततळ्याजवळ खेळत होते. खेळता-खेळता ते शेततळ्यातलं पाणी पाहू लागले. यावेळी तीनही चिमुकले पाण्याजवळ गेले. त्यांचा पाय घसरुन ते शेततळ्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने दुर्देवाची घटना घडली. या तीनही चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृतक चिमुकल्यांमध्ये दोघे मुलं हे सख्खे भाऊ होते. संबंधित घटना उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चिमुकल्यांचे आई-वडील आणि घरातल्या इतर सदस्यांचा आक्रोश बघून गावकऱ्यांचे देखील डोळे पाणावले आहेत.
संबंधित घटना ही अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव येथे घडली आहे. चैतन्य अनिल माळी (वय 10 वर्ष), दत्ता अनिल माळी (वय 7 वर्ष), चैतन्य शाम बर्डे (वय 8 वर्षे) ही चिमुकले आज शेतात शेततळ्याजवळ खेळत होते. सध्या शाळा बंद असल्याने मुलं शेतात जातात. त्यानुसार ते आज शेतात गेले होते. शेतात शेततळ्यात ते खूप चांगल्याप्रकारे खेळत होते. या दरम्यान ते शेततळ्यातलं पाणी पाहू लागले. या दरम्यान ते पाण्याजवळ गेले. त्यांचा पाण्यात तोल गेला आणि त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
संबंधित घटनेनंतर त्यांचे आई-वडील आणि इतर कुटुंबिय चिमुकल्यांचा शोध घेऊ लागले. शेततळ्याजवळ आल्यावर तीनही चिमुकल्यांचे मृतदेह तरंगताना दिसले. यावेळी परिसरात मोठी खळबळ उडाली. मुलाच्या कुटुंबियांनी टाहो फोडत आक्रोश केला. संबंधित घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर संपूर्ण गाव घटनास्थळी दाखल झालं. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने तीनही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. एकाच घरातील दोन चिमुकल्यांचा असा दुर्देवी अंत झाल्याने पंचक्रोशित हळहळ व्यक्त केली जातेय.