महाराष्ट्रNewsPopular NewsRecent NewsTrending Newsक्राईमभारत

तूळजाभवानी मातेच्या खजिन्यावर डल्ला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

२० सप्टेंबर | महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यावधी जनांचे आराध्य दैवत असलेल्या श्री आई तुळजा भवानी मातेच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याला अखेर पोलिसांनी अटक केली असून आज तुळजापूर येथील न्यायालयासमोर त्याला हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

गुन्हा नोंद झाल्यापासून दिलीप नाईकवाडी तब्बल १ वर्ष फरार होता. मात्र अखेर त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्याच. नाईकवाडी याने ३५ तोळे सोने, ७१ किलो चांदी व ७१ प्राचीन नाणी गायब केल्याप्रकरणी गेल्या वर्षी १३ सप्टेंबर २०२० रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता. नाईकवाडी याच्या १७ वर्षाच्या कालावधीत त्याने टप्प्याटप्प्याने पुरातन नाणी गायब केली. त्यामुळे या काळात त्याला कोण मदत करत होतं? त्याचे साथीदार व सूत्रधार कोण आहेत? ही नाणी सध्या कुठे आहेत, यासह अन्य बाबी तपासात समोर येणार आहेत. श्री तुळजा भवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी त्यांचे वकील अॅड शिरीष कुलकर्णी यांच्या मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्याकडे ९ मे २०१९ रोजी या बाबत लेखी तक्रार केली होती. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांनी तात्काळ या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती. त्यामध्ये अनेक धक्कादायक प्रकार समोर आले होते.

‘ श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान ‘च्या धार्मिक व्यवस्थापकपदी दिलीप नाईकवाडी कार्यरत असताना २९ नोव्हेंबर २००१ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत नाईकवाडी याने पदाचा दुरुपयोग करत श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान व भाविकांची फसवणूक केली असून त्याच्या ताब्यात असलेला श्री तुळजा भवानी देवीचा खजिना व जामदार खान्यातील अतिप्राचिन अलंकार, वस्तू तसेच भाविकांनी अर्पण केलेले सुमारे ३४८.६६१ ग्रॅम सोने व सुमारे ७१६९८.२७४ ग्रॅम चांदीच्या वस्तू तसेच ७१ प्राचीन नाणी याचा वैयक्तिक स्वार्थासाठी अपहार, चोरी केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. या फिर्यादीवरुन पोलिसांनी दिलीप नाईकवाडी याच्या विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२३, ४२०, ४६४, ४०९, ४६७, ४६८, ४७१, ३८१ गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांची बदली झाल्यानंतर श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान चे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश दिल्यावर १३ सप्टेंबर २०२० रोजी श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांनी फिर्याद दिल्याने तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.