गेवराई तालुक्यातील दोन्हीही रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने गेवराई तालुका कोरोना मुक्त झाला
गेवराई – :- गेवराई तालुक्यात मागिल दोन महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने जवळपास वीस हजार लोकांना होम क्वारांटाईन केले होते.तसेच इटकूर गावात दोन पाॅझिटिव्ह आल्याने गेवराई प्रशासनाने या परिसरातील पाच ते सहा गावात संचारबंदी अधिक कडक करत उपाय योजना आखल्या.तसेच या परिसरातील गावागावात नागरिकांच्या घरोघरी जाऊन वैधकीय तपासण्या करण्यात आल्या.याला सर्व श्रेय जाते ते म्हणजे तालुका वैधकीय आधिकारी डाॅ.संजय कदम,पोलिस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड,तहसीलदार प्रशांत जाधवर,पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे व त्यांच्या सहकार्य लोकांना.तालुक्यातील दोन्हीही रुग्णाचे काल रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने गेवराई तालुका आता कोरोना मुक्त होऊन तालुक्याला दिलासा मिळाला आहे.गेवराई तालुका प्रशासनाने मागिल दोन महिन्यात डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य बजावल्याने गेवराई तालुक्याला आता कोरोना पासुन मोठा दिलासा मिळाला आहे.