अर्धा तास तडफडतच महिलेचा मृत्यू
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
18 सप्टेंबर : देशभरात कोरोनाच्या महामारीमुळ लाखो लोकांचा जीव गेला आहे. अद्यापही कोरोनाची महासाथीची टांगती तलवार असून तिसऱ्या लाटेत पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कोरोना महासाथीदरम्यान एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोना तपासणीदरम्यान निष्काळजीपणा पाहायला मिळाला आहे. या मुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. कोरोना टेस्ट करताना किटमधील दांडी महिलेच्या गळ्यात अडकली. यानंतर अर्धा तास महिला तडफडत राहिली व त्यातच तिचा मृत्यू झाला. ही घटना बिहारची राजधानी पाटना या भागात घडल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राम बहाद्दूर दार यांची 65 वर्षीय पत्नी जासो देवी या कोरोनाची टेस्ट करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी तोंडात तपासणीसाठी किट घालण्यात आलं तेव्हा ते गळ्यामध्येच अडकलं, अशी माहिती मृत महिलेचे पती राम बहाद्दूर दास यांनी दिली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, वैद्यकीय व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मात्र अधिकाऱ्यांनी कोरोना तपासणीदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप फेटाळला आहे.
जासो देवी या कोरोनाची चाचणी करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांच्या तोंडात कोरोना चाचणी किट घालण्यात आलं. मात्र ते तोंडातच अडकलं. यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. यातच त्या बेशुद्ध पडल्या. यानंतर तातडीने डॉक्टरांना बोलावण्यात आलं. मात्र डॉ. कमलेश कुमार यांनी टेस्टदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचा नकार दिला आहे.