स्वतःची लघवी पिऊन मुलांना पाजलं दूध
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
17 सप्टेंबर : जगातील सर्वात बलाढ्य योद्धा असते आई. आई आपल्या मुलांसाठी कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकते. वेळप्रसंगी ती आपला जीव देऊन आपला मुलांचा जीव वाचवते. दक्षिण अमेरिकेत अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. भरसमुद्रात आपल्या मुलांसह अडकलेल्या आईने स्वतःची लघवी पिऊन मुलांना आपलं दूध पाजलं आणि त्यांचा जीव वाचवला आणि नंतर तिने आपला जीव सोडला.
40 वर्षांची मैरिली चाकोन आपल्या कुटुंबासह जहाजातून प्रवास करत होती. तिच्यासोबत तिचा नवरा, 6 वर्षांचा एक मुलगा, दोन वर्षांची मुलगी आणि त्यांची आया वेरोनिका होती. 3 सप्टेंबरला व्हेनुजुएलाहून टॉर्टुगासाठी हे जहाज निघालं. पण कॅरिबिअनमध्ये भयानक दुर्घटना झाली.
जहाज तुटलं आणि डुबू लागलं. जहाजाचा काही भाग आणि त्यातील फ्रिज समुद्रात तरंगत राहिला. या दुर्घटनेत मॅरिली, तिची मुलं आणि आया वाचले. जहाजाच्या तुटलेल्या भागाच्या मदतीने ते तरंगत राहिले. जीव तर वाचला पण पोटात अन्न नाही, प्यायला पाणी नाही. मुलंही भुकेने व्याकूळ झाले होती. आपल्या मुलांचा आपल्या डोळ्यादेखत जीव जाताना एक कशी पाहू शकते. शेवटी ती स्वत:चीच लघवी प्यायली. जेणेकरून तिच्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये. लघवी पिऊन तिने आपल्या मुलांना ब्रेस्टफिंडिंग केलं आणि त्यांचं पोट भरलं.
चार दिवसांनंतर रेस्क्यू टीम त्यांच्यापर्यंत पोहोचली. तोपर्यंतच मॅरिलीचा मृत्यू झाला होता. तिचे मुलं आणि त्यांची आया जिवंत होती, पण ते गंभीर अवस्थेत होते. बचाव पथकाने सांगितल्यानुसार ते तिथं पोहोचण्याच्या काही तास आधीच आईचा डिहायड्रेशनमुळे म्हणजे शरीरात पाणी नसल्याने मृत्यू झाला. दोन्ही मुलं आणि आयाच्या शरीरातही पाणी नव्हतं. उन्हामुळे त्यांच्या शरीराची त्वचा अक्षरशः जळाली होती. वॅरोनिका स्वतःचा जीव वाचवण्यासाठी फ्रिजच्या आत गेली होती. दोन्ही मुलं आईच्या मृतदेहावरच होती.व्हेनुजुएला नॅशनल मरीटाइम अथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार जहाजावर एकूण नऊ प्रवासी होते. 7 सप्टेंबरला 4 जणांना रेस्क्यू करण्यात आलं. आणखी पाच जण बेपत्ता आहेत. ज्यात मॅरिलीचा नवराही आहे.