मुलाचं लिंग कापत हत्या, मुलीचा गळा चिरला
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
प्रत्येकाला हवं तसं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. आपण कुणावर प्रेम करावं किंवा कुणासोबत लग्न करावं,याबाबत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र, आपल्या देशातही आजही प्रेम विवाह ही संकल्पना समाजात पूर्णपणे रुजलेली नाही. त्यातूनच सैराट चित्रपटासारख्या ऑनर किलिंगच्या घटना समोर येतात. या हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरतो. या घटनांवर काही दिवस चर्चा होते. त्यानंतर सर्वचजण विसरतात आणि आपापल्या मार्गाला लागतात. पण त्यावर योग्य मार्ग निघत नाही.
समाज प्रगल्भ व्हावा यासाठी काहीतरी चांगला मार्ग निघत नाही. त्यामुळे पुन्हा काही दिवसांनी तशीच घटना समोर येते. उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथून अशीच ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हत्येची घटना फक्त उत्तर प्रदेशच नाही तर मध्यप्रदेश आणि राजस्थान अशा एकूण तीन राज्यांसोबत जोडली गेली आहे.
फिरोजाबाद येथे वास्तव्यास असलेले प्रेमी युगुल एकमेकांवर प्रचंड प्रेम करायचे. पण दोघांच्या कुटुंबियांना त्यांचं प्रेम मान्य नव्हतं.दोघं एकमेकांशिवाय राहू शकणार नाहीत, अशी त्यांची भूमिका होती. अखेर दोघांनी कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानला 31 जुलैला पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते फिरोजाबाद येथून पळून दिल्लीला गेले. प्रेमी युगुल पळून गेल्यानंतर मुलीचे कुटुंबिय सैरभैर झाले. ते दोघांना शोधायला निघाले.
या दरम्यान मुलगा-मुलगी दिल्लीला गेल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार मुलीचे कुटुंबिय दिल्लीत त्यांचा शोध घेत होते. अखेर त्यांनी दोघांना शोधून काढले. त्यानंतर मुलीचे नातेवाईक दोघांना मध्यप्रदेशच्या ग्वालियर शहरात घेऊन आले. तिथे झांसी महामार्गावर त्यांनी तरुणाला अमानुषपणे मारहाण केली. यावेळी आरोपीने तरुणाचे लिंग कापत त्याची हत्या करतात. त्यानंतर त्याचा मृतदेह फेकून दिला. दुसरीकडे मुलीसोबतही आरोपीने विकृत कृत्य केलं. आरोपीने मुलीचा गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर तिला घटनास्थळापासून 100 किमी दूर राजस्थानच्या धौलपूर परिसरात फेकून पळून गेले.
संबंधित घटनेनंतर 5 ऑगस्टला ग्वालियरच्या पोलिसांना मृतक तरुणाचा मृतदेह सापडला. तरुणाचा मृतदेह बघून त्याची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पण मृतक तरुणाची ओळख होत नाही. दुसरीकडे मृतकच्या वडिलांनी फरीदाबाद येथील पोलीस ठाण्यात आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. याच दरम्यान राजस्थान पोलिसांना धौलपूर परिसरात मृतक तरुणीचा मृतदेह सापडला. तिचा गळा चिरुन हत्या झाल्याचं पोलिसांना समजल. पोलीस या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली.
सगळ्या घडामोडी आपापल्या ठिकाणी घडत असताना फिरोजाबाद पोलीस ग्वालियरच्या पोलिसांना संपर्क केला. त्यांच्यात झालेल्या संभाषणात ग्वालियर इथे मिळालेला मृतदेह हा फिरोजाबादच्या तरुणाचं असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलीस आणखी खोलात तपास करत तरुणाच्या प्रेम प्रकरणाची माहिती त्यांना मिळला. पोलीस मृतकाच्या प्रेयसीच्या कुटुंबियांचा फोन नंबर शोधून काढत. त्यानंतर पोलीस तांत्रिक पद्धतीने तपास करत आरोपींचे मोबाईल लोकेशन ट्रेस करत मुलीचे वडील, काका आणि आणखी दोन नातेवाईकांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर आरोपीनी आपला गुन्हा कबूल केला. या प्रकरणाचा आणखी पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.