गडकरींनी सासरच्या घरी चालवला बुलडोझर
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
१६ सप्टेंबर | दिल्ली ते मुंबई अवघ्या 12 तासांचा प्रवास लवकरच साकार होणार आहे. हरियाणा, राजस्थान आणि गुजरातसह विविध राज्यांतून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. दरम्यान, आज (ता.१६) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचा आढावा घेतला. त्यांनी इथल्या बांधकामाची माहितीही घेतली. पण त्याच वेळी नितीन गडकरी यांनी अनेक वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा सांगत रहस्य उलगडले. विशेष म्हणजे तेव्हा याबद्दल त्यांच्या पत्नीलाही माहित नव्हते. काय म्हणाले गडकरी….
गडकरी म्हणाले की, जेव्हा माझे नुकतेच लग्न झाले होते. तेव्हा माझ्या सासरचे घर रस्त्याच्या मधोमध येत होते. यानिमित्ताने, सोहना येथे आपल्या भाषणादरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तेथे उपस्थित अभियंते आणि पत्रकारांसोबत त्यांच्या दीर्घ कार्यकाळातील अनुभवही सांगितले. एका घटनेचा संदर्भ देत नितीन गडकरी म्हणाले- ‘जेव्हा माझे नुकतेच लग्न झाले होते. तेव्हा माझ्या सासरचे घर रस्त्याच्या मधोमध येत होते. साहजिकच ही एक मोठी समस्या होती. कारण तिथल्या वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता.
तसेच तिथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांनाही… अशा परिस्थितीत, त्यातून मुक्त होणे पूर्णपणे आवश्यक होते. या समस्येबाबत, नितीन गडकरींनी सांगितले की संपूर्ण प्रकरण रामटेकचे आहे आणि रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या घरामुळे ते अडचणीत आले होते. यावेळी नितीन गडकरींनी पत्नीला न कळवता सासरच्या घरी बुलडोझर चालवला आणि रस्ता केला. यानंतर, सामान्य जनतेची रहदारी सुरळीत झाली