या महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
राज्यात कोरोनाचा धोका टळलेला नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिसऱ्या लाटेचा धोका हा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आहे. कोविड नियंमांचे पालन करायला पाहिजे. केंद्राच्या सूचनेद्वारे आपण सगळे नियम पाळत असतो, मात्र, हे सगळे किती लांबवायचे हे आपल्या हातात आहे, असे आरोग्य राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोविडची तिसरी लाट राज्यात आलेली आहे असे मी म्हणणार नाही, टेस्टींग खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. पॉझिटीव्हीटी रेट कमी आहे. जगात बघितलं तर तिसरी लाट आलेली आहे, पण ही तिसरी लाट सौम्य आहे, असे आरोग्यमत्री टोपे म्हणाले
गणपती सुरु आहे. दसरा दिवाळी आहे. सण-वार सुरु आहेत. लोकांचे म्हणणं होतं शिथिलता कमी करा, ती कमी केलेली आहे. परंतु टेस्टींग कमी केलेले नाही. यावर लसीकरण हाच पर्याय आहे. आपण 7 कोटी डोस दिलेले आहेत. 55 टक्के पहिले डोस झालेत, 25 टक्के दुसरे डोस झाले आहेत, अशी माहिती टोपे यांनी यावेळी दिली.