बापानेच केला मुलाचा खून
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
15 Sept :- बीड तालुक्यातील नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खडकीघाट येथील एका वस्तीवर एका पत्र्याच्या शेडमध्ये एका १३ वर्षीय मूलाचा मृतदेह आढळून आला आहे. हि घटना आज बुधवार रोजी घडली असुन घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी सहकार्यसह घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेऊन तिचे निरीक्षण केले असता मुलाचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले.
हा खुन कुटुंबीयांतीलच कोणी तरी केला असावा असा संशय झाल्याने सदरील मुलाच्या बापानेच खून केला असावा कारण तो घटनास्थळी हजर नव्हता स. पो. नि. मुस्तफा शेख यांनी तपासाची चक्रे फिरवली व आरोपीला पाटोदा येथून ३ तासात अटक केले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. राकेश उमेश वाघमारे वय १३ वर्षे असे मृत मुलाचे नाव असून त्याचा मृतदेह बीड तालुक्यातील खडकीघाट येथील खोखडोह वस्तीवरील शेतातील एका पत्र्याच्या शेड मध्ये बुधवारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाचे निरीक्षण केले असता मुलाचा खून गळा आवळून केला असल्याचा त्यांच्या निदर्शनास आले असता हा कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीने केला असावा असा संशय त्यांना आणि त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवली असता मुलाचा बाप उमेश वाघमारे हा तेथे नव्हता थोडा ही विलंब न करता पोलिसांचे एक पथक त्या मध्ये पो. कां. घोलप, नवले, खांडेकर, जायभाय, डोंगरे, नागरगोजे, यांना अहमदनगरच्या दिशेने पाठवले असता या पथकाने पाटोदा बस स्थानक येथे सापळा रचून आरोपीला अटक केली तिच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळाची पाहणी करून काही मिनिटांत हा गुन्हा उघडकीस आला व अवघ्या तीन तासात आरोपी अटक करण्यात आल्याने स. पो. नि. मुस्तफा शेख व त्यांच्या पथकाचे कौतुक होत आहे. बापानेच मुलाच्या खुन का व कशासाठी केला याचा अधिक तपास नेकनुर पोलीस करत आहे.
जमीनीच्या वादावरून मुलाचा खून
अल्पवयीन मुलाचा गळा आवळून खून करणारा तिचा सख्खा बापच निघाला असुन नेकनुर पोलीस घटनास्थळी गेले असता तो पहाटेच तेथून फरार झाला होता तिला तीन तासात नेकनुर पोलीसानी अटक केली असता त्यांनी जमिनीच्या वादावरून हा खुन केल्याची पोलिसांकडून माहिती मिळाली आहे. अरोपी उमेश वाघमारे याने तीन विवाह केले असुन पहिली सोडून गैली आहे. दुसरीने आत्महत्या केली आणि तिसरी सोबत बीड येथे राहत होता. आपल्या पहिल्या पत्नीचा मुलगा आज्जी सोबत खडकीघाट येथे राहत अस्ताना जमिनीच्या वादावरून खुन केला असल्याची माहिती समोर येत आहे.