Gang RapeNewsPopular NewsRecent NewsTrending Newsक्राईमभारतमहाराष्ट्र

साकीनाका बलात्कार प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांची विशेष माहिती

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

साकीनाका बलात्कार प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्रकार परिषद घेत, आरोपीने गुन्हा कबुल केल्याची माहिती दिली आहे. तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेले शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. आरोपीला सध्या 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सबळ पुरावे मिळाले आहेत. गुन्हा कसा झाला याचा घटनाक्रम पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाला आहे.

येत्या महिनाभरात किंवा त्याआधी संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण केला जाईल, असंही पोलीस आयुक्तांना सांगितलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगच्या सदस्या चांद्रमुखी आणि अरुण हलदर यांनी सुद्धा भेट दिली आणि चर्चा केली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केला आहे. तसेच आज 1.30 वाजता मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि इतर अधिकाऱ्यांची सह्याद्री येथे बैठक झाली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत जाहीर केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.