राज्यसभा खासदार,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यांचं निधन
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचे सोमवारी निधन झाले. 80 वर्षीय ऑस्कर फर्नांडिस बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना मंगळुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वर्षी जुलैमध्ये त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेपासून ते कोमात गेले होते.ऑस्कर फर्नांडिस हे गांधी कुटुंबाचे खूप जवळचे मानले जात होते. यूपीए सरकारमध्ये ते रस्ते वाहतूक मंत्रीही होते.ऑस्कर फर्नांडिस हे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचे संसदीय सचिव होते.
कर्नाटकच्या उडुपी लोकसभा मतदासंघातून ते १९८० साली ते निवडून गेले होते. एवढचं नव्हे तर ते या मतदारसंघातून एक दोन वेळा नव्हे तर तब्बल ५ वेळा निवडून येत खासदार झाले होते. १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते काँग्रेसकडून राज्यसभेवर गेले.ऑस्कर फर्नांडिस हे माजी केंद्रीय मंत्री होते. परिवहन, कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे मंत्री होते. काँग्रेसच्या अखिल भारतीय निवडणूक समिचीचे अध्यक्ष होते. तसंच काँग्रेसचे माजी सरचिटणीसही होते.
ऑस्कर फर्नांडिस यांचे वडील हे शाळेत शिक्षक होते. फर्नांडिस हे दोन टर्म कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिले. काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचे ते लाडके नेते होते. कार्यकर्ते कामसाठी रात्रीअपरात्री कधीही त्यांच्या भेटीसाठी जात होते.कुठल्याही स्थितीवर तोडगा किंवा मार्ग काढणारे काँग्रेसचे नेते अशी त्यांची ओळख होती.
त्यांनी ईशान्य भारतातील बंडखोरांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यास मदत केली. शिवाय सरकार आणि पक्षातील कुठलाही वाद असो, तो सोडवण्यात त्यांची मोठी भूमिका राहिली. त्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरेची जाण होती फर्नांडिस हे स्वतः कुचीपुडी आणि यक्षगंगाचे डान्सर होते.