राजकारणNewsPopular NewsRecent NewsTrending Newsक्राईमभारतमहाराष्ट्र

आमदार पाटील यांच्यावर गुन्हा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

सुनेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी आमदार पी.एन. पाटील यांच्यासह त्यांचा मुलगा व मुलीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सौ. अदिती राजेश पाटील यांनी कराड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अदिती ही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची पुतणी आहे. आमदारांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, दोन वर्षापूर्वी पी.एन. पाटील यांचा मुलगा राजेश व अदिती यांचा मोठ्या थाटामाटात कोल्हापुरात विवाह संपन्न झाला. लग्नानंतर आपला सासरी छळ करतानाच एक कोटीची मागणी केल्याचे अदिती यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सासरे पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी एन. पाटील, पती राजेश पांडुरंग पाटील व नणंद सौ. टीना महेश पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पी.एन. पाटील हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. बाळासाहेब पाटील सहकार मंत्री तर अदितीचे वडिल सुभाष पाटील हेदेखील राजकारणात ज्येष्ठ नेते आहेत. गेले दोन तीन महिने या कुटुंबात वाद सुरू होता. तो मिटविण्यासाठी राजकीय पातळीवर समझोता करण्याचे प्रयत्न झाले. पण त्यात यश आले नाही.

आमदार पी. एन. पाटील यांनी त्यांच्यावरील आरोपांवर प्रतिक्रिया व्यक्त करत आरोपांचा इन्कार केला आहे. सुनेचा छळ करण्याचा कोणताही प्रकार आमच्याकडून घडलेला नाही. लग्न झाल्यापासून ती बहुतांशी काळ माहेरलाच आहे. त्यामुळे तिचा छळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी राजकारणात आहे. अनेकांना नोकरी लावली. कुणाचा चहा देखील घेतला नाही. त्यामुळे सुनेकडे एक कोटी रुपये मागण्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मनाला क्लेशदायक असणारा हा आरोप खोटा आहे.