राज्यात एका आठवड्यात ६ तर आज सलग ३ बलात्कार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
11 सप्टेंबर : पुण्यात रेल्वे स्थानक परिसरातून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून रेल्वेतील दोन कर्मचारी तसेच रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार ६ सप्टेंबर रोजी उघडकीस आला होता तोच आणखी एक संतापजनक घटना पुण्यात ९ सप्टेंबर रोजी घडली होती. रेल्वे स्टेशन परिसरातील एसटी स्थानकाच्या फुटपाथवर आईच्या कुशीत झोपलेल्या सहा वर्षीय चिमुकलीला उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती.
तसेच मुंबईमध्ये साकिनाका येथील गँगरेप प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे.तर आज ११ सप्टेंबर रोजी सलग ३ बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत.तिकडे पिंपरीत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त असल्याचे सांगत एका नराधमाने शिक्षिकेवर बलात्कार केला. तर दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीशी नराधमाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याची धक्कादायक बाब समोर आली. पीडित तरुणी 17 वर्षाची आहे.
यातून अल्पवयीन 7 महिन्याची गर्भवती राहिली.बदनामीच्या भीतीपोटी तिने स्वतः ला गळफास लावून संपवलं. सध्या येवदा पोलिसांनी नराधमास ताब्यात घेतले आहे. तर पोस्को अंतर्गत गुन्हे देखील दाखल केला आहे तात्काळ उघडकीस आलेल्या पिंपरी-चिंचवड एका अल्पवयीन मुलीवर सराईत गुंड आणि त्याच्या साथीदारांनी बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बलात्कार करणारा सराईत गुंड आणि त्याचे साथीदार गजाआड करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या घरात आपल्या गॅंगच्या सदस्यासोबत बळजबरीने घुसून तिला आणि तिच्या कुटुंबीयांना मारहाण केली होती. हे नराधम एवढ्यावरच थांबले नव्हते तर त्यांनी पीडितेचा लैगिंक अत्याचार करतानाची व्हिडीओ क्लिप व्हायरल करेन, नाही तर तुम्हाला ठार मारले, अशी धमकी देत आरोपींनी पीडित अल्पवयीन मुलीवर वारंवार सामूहिक लैगिंक अत्याचार केले होते.
चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडत असल्याची बाब पोलिसांना समजली. त्यावेळी, चिंचवड पोलिसांनी एका बाल गुन्हेगार आणि दोन 18 वर्षा वरील गुन्हेगाराविरोधात बाल लैगिंक अत्याचाराचे गुन्हे दाखल केले आहे. यातील तिन्ही आरोपी हे बाल वयात असतानाच त्यांनी खुना सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.
सुरुवातीला तिन्ही आरोपीच्या दहशतीमुळे फिर्यादी पीडित मुलगी आणि तिची आई आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी घाबरत होते. मात्र पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पीडित मुलगी आणि तिच्या आईला त्यांच्या सुरक्षितेविषयी मानसिक आधार दिला आणि तिन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.
यातील एका बाल गुन्हेगाराला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतल असून दोन 18 वर्षावरील फरार गुन्हेगारांचा शोध चिंचवड पोलीस करत आहेत.