NewsPopular NewsRecent NewsTrending Newsभारतमहाराष्ट्रराजकारण

चंद्रकांत पाटील गुजरात चे नवनिर्वाचित मुखमंत्री..?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

११ सप्टेंबर : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर गुजरातमधील अनेक नेत्यांची नावं सध्या चर्चेत आलेली आहेत. सध्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. विशेष म्हणजे या चर्चेत एक मराठमोळं नाव आघाडीवर आहे. सध्या गुजरातचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं नाव नव्या मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे.

आज मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतली आणि त्यांनी आपला राजीना सोपवला आहे. रुपाणी यांनी या राजीनाम्यामागचे नेमके कारण स्पष्ट केलेलं नाहीये. मात्र गुजरात काँग्रेसचे विजय रुपाणी यांना भारतीय जनता पक्षाचे अपयश लपवण्यासाठी बळीचा बकरा बनवण्यात आला असल्याची टीका केली आहे. रुपाणी यांच्या रुपाने गेल्या काही दिवसात भाजपच्या तिसऱ्या मुख्यमंत्र्यांचा असा तडकाफडकी राजीनामा झाला आहे.

याआधी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी देखील अशाच धक्कादायक पद्धतीने राजीनामा दिला होता. तर त्याआधी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदावरुन तिरथ सिंग रावत यांना राजीनामा द्यावा लागला होता.गुजरात विधानसभेची निवडणुक पुढील वर्षी होणार आहे. त्याच्या १ वर्ष आधीच रुपाणी यांच्या राजीनाम्यामागे काय गौडबंगाल आहे, याबाबत चर्चा सुरु आहेत. आता उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिले जाते की नवीन व्यक्तीवर जबाबदारी दिली जाते, ते पाहणं निर्णायक ठरणार आहे.

मात्र, चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री पद दिलं गेलं तर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पहिला मराठी माणूस येऊ शकतो. त्यामुळं महाराष्ट्रातून देखील चंद्रकांत पाटील यांच्या नावाला पसंती मिळतेय.सध्या म्यानमारमध्ये असलेल्या बुरमा मध्ये २ ऑगस्ट १९५६ रोजी एका जैन कुटुंबात विजय रुपाणी यांचा जन्म झाला. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत असलेल्या विजय रुपणी यांच्या राजकीय कारकिर्दीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश करत १९७१ मध्ये जन संघासोबत देखील काम सुरु केले. १९७६ साली आणीबाणीच्या काळात ११ महिने ते तुरुंगात होते.

त्यानंतर १९८७ साली ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम करत होते. पुढे पहिल्यांदाच राजकोट शहराचे महापौर झाले. त्यांनी भारतीय जनता पक्षातील वेगवेळ्या पदावर काम करत संघटनेच्या बळकटीकरणासाठी काम केलं.