राजकारणGang RapeNewsPopular NewsRecent NewsTrending Newsक्राईमभारतमहाराष्ट्र

साकीनाका अत्याचार प्रकरणी पीडित महिलेचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितल्या प्रमाणे , राजावाडी रुग्णालयात पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली होती. पीडित महिलेवर आधी टेम्पोमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेची प्रकृती गंभीर झाली होती.

या प्रकरणी आरोपीला घटनेच्या काही तासांच्या आत अटक करण्यात आलं आहे. पोलिसांनी सांगितलं होतं की, शुक्रवारी पहाटे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला की खैराणी रोडवर एक पुरुष एका महिलेला अमानुषपणे मारहाण करत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळी रक्ताने माखलेल्या महिलेला महानगरपालिका प्रशासित राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली असून राज्यभरातून राजकीय नेते तसेच नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. औरंगाबादमध्ये भाजप महिला आघाडीच्या नेत्या तसेच कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या आहेत. भाजप महिला आघाडीकडून न्यू गणेश मंडळासमोर आंदोलन करण्यात आले