राजकारणNewsPopular NewsRecent NewsTrending Newsभारत

“गुजरातच्या राजकारणात भूकंप”,मुखमंत्र्याचा राजीनामा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

११ सप्टेंबर | गुजरातचे भाजपचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री रूपाणी यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर रूपाणी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. त्या वेळी पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे रूपाणी यांनी आज (11 सप्टेंबर) आपला राजीनामा सोपवला.

राजीनामा दिल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रुपाणी म्हणाले, मी राजीखुशीनं राजीनामा दिला आहे, कुणाचाही माझ्यावर दबाव नाही. मला संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. तसेच माझ्या सहकाऱ्यांचे देखील आभार मानतो, पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती मी पार पाडणार आहे. जेपी नड्डा यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी देखील अभूतपूर्व आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्य निवडणुका लढतो आणि 2022 च्या निवडणुकाही त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहे.

गुजरातला आता नवं नेतृत्त्व मिळेल. नवीन नेतृत्त्वाला संधी देणं ही भाजपची परंपरा आहे. पदाचा राजीनामा देऊन संघटनेसाठी काम करण्याची इच्छा आहे, असं देखील रूपाणी या वेळी म्हणाले.
गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांना जेमतेम वर्षभराचा अवधी शिल्लक असल्याने विजय रुपाणी यांचा राजीनामा अनेक राजकीय पंडितांना आश्चर्यचकित करणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याशिवाय विजय रुपाणी राजीनाम्याचा निर्णय घेऊ शकणार नाहीत, हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे.

26 डिसेंबर 2017 रोजी रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. भाजपाने गुजरातमध्ये बहुमत मिळवले होते. त्यामुळे आता नवे मुख्यमंत्री कोण याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.