NewsPopular NewsRecent NewsTrending Newsक्राईमभारतराजकारण

MIM खासदार ओवैसींवर गुन्हा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे अध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.उत्तर प्रदेश मधील बाराबंकी जिल्ह्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणे आणि राष्ट्रध्वजाचा अपमान केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.खासदार असदुद्दीन ओवैसी हे बुधवारी उत्तरप्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील एका गावात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन झाल्याने कार्यक्रमाच्या आयोजकांसह खासदार औवेसी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी देखील त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला.

उत्तरप्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यातील कटरामध्ये आयोजित कार्यक्रमात खासदार ओवैसी यांच्यासह मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले होते. यावेळी ओवैसी या कार्यक्रमाला झालेली गर्दी आणि असदुद्दीन ओवैसींनी कार्यक्रमादरम्यान केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर हे गुन्हे दाखल केले गेले आहेत. यावेळी ओवैसी यांनी भडकाऊ भाषण केले, तसेच त्यांनी पंतप्रधान, भारत सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांविरोधात चुकीच्या शब्दांचा वापर केला असे आरोप करण्यात आले आहेत.

खासदार ओवैसी यांच्यावर या प्रकरणात भादवि कलम १५२अ, कलम १८८, कलम २६९, कलम २७० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. ओवैसी यांनी या कार्यक्रमात, रामस्नेही घाट येथील मस्जित प्रकरणावर विधान केले होते.