kidnapNewsPopular NewsRecent NewsTrending Newsक्राईमभारतमहाराष्ट्र

तीन महिन्याच्या बाळाचे अपहरण

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

१० सप्टेंबर | पुण्यातील ससून रुग्णालयात नर्सच्या वेशभूषेत आलेल्या एका महिलेने तीन महिन्याचे बाळ पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस आणि नागरिकांनी सतर्कता दाखवत रिक्षाचा पाठलाग केला आणि या बाळाची सुखरूप सुटका केली. आणि बाळ पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका महिलेला अटक केली आहे.

एक महिला तिच्या दोन मुलीसह उपचारासाठी ससून रुग्णालयात आली होती. मोठ्या मुलीला सोनोग्राफी करण्यासाठी त्यांना जायचे होते. डॉक्टरांनी आतमध्ये बोलावल्यामुळे त्यांनी तीन महिन्याच्या छोट्या मुलीला ओळखीच्या महिलेजवळ ठेवले. याच दरम्यान नर्सच्या वेशभूषेत आलेल्या एका महिलेने बाळाला माझ्याजवळ द्या म्हणत तिच्याकडून बाळ घेतले. त्यानंतर बाळाचे अपहरण करून पळ काढला.

दरम्यान महिला सोनोग्राफी कक्षाच्या बाहेर आल्यानंतर तिला बाळ दिसले नाही. आसपास शोधाशोध केल्यानंतर तिने सुरक्षारक्षकांना विचारले. जवळच ऑटोरिक्षा स्टँड होते तिथे देखील विचारलं तेव्हा एक रिक्षाचालकाने सांगितलं की, आत्ताच एक महिला छोट्याशा बाळाला घेऊन जाताना दिसली. आरोपी महिला ज्या रिक्षामधून बाळाला घेऊन पळ काढत होती. तो रिक्षाचालक ससूनच्या बाहेर असलेल्या रिक्षा स्टॅन्डचा ऑटो रिक्षा मेंबर होता. इतर ऑटो रिक्षा चालकांनी त्याला तातडीने फोन लावला. “तुझ्या रिक्षामध्ये जी महिला लहान मुलाला घेऊन चालली आहे तिने ससून हॉस्पिटलमधून हे लहान बाळ पळवलं आहे अशी माहिती दिली आणि तू त्या महिलेला गुंतून ठेव आणि तुझी ऑटो रिक्षा हळू चालव”, या संदर्भातली माहिती तातडीने जवळच्या बंडगार्डन पोलिसांना दिली. पोलिसांनी सतर्कता दाखवत सीसीटीव्हीच्या मदतीने संबंधित रिक्षाचा शोध घेतला आणि रिक्षाचा पाठलाग करून बाळाची सुखरूप सुटका केली.

ही आरोपी महिला जी या लहान तीन महिन्याच्या बाळाला (मुलगी) घेऊन पळून गेले होती. ती महिला उच्चशिक्षित आहे त्याचबरोबर या महिलेच्या लग्नाला सात वर्ष झाले आहेत. मात्र कुठलंही अपत्य आपल्याला होत नाही. आणि या कारणामुळे नवऱ्याकडून, सासू, सासरा कडून सातत्याने यासंदर्भात बोलणं ऐकावे लागत होतं ( टोमणे ऐकावे लागत होते). अखेर तिने हा मार्ग निवडला आणि ससून हॉस्पिटलमध्ये नर्स चे कपडे घालून एक लहान तीन महिन्याच्या मुलीला पळून नेलं. मात्र तिचा हा सगळा प्लॅन फसला आणि आता तिला पोलिसांनी अटक केली आहे.