NewsGang RapePopular NewsRecent NewsTrending Newsक्राईमभारतमहाराष्ट्र

बलात्कार करत पीडितेच्या गुप्तांगात घुसवला रॉड

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10Sept | मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. आरोपींनी बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचा संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे पुण्यात आठवड्याभरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सामूहिक बलात्कारासारख्या हादरवणाऱ्या तीन घटना ताज्या असताना आता राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतही अशाप्ररकारची घटना समोर आल्याने पोलीस प्रशासनाच्या कामकाजांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.


दरम्यान, मुंबईतील घटना ही गुरुवारी मध्यरात्री (9 सप्टेंबर) घडली. या घटनेतील मुख्य आरोपी मोहन चोहान यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दुसरीकडे पीडित महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. ती अद्यापही बेशुद्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टर मोठ्या शर्थीने प्रयत्न करत आहेत.

संबंधित घटना ही दहा वर्षांपूर्वी दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कारासारखी आहे. त्यामुळे आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. याप्रकरणी पोलीस आता नेमकी काय कारवाई करतात ते पाहणं आवश्यक आहे.साकीनाका खैरानी रोड येथे काल रात्री तीनच्या सुमारास कंट्रोल रुमला एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी ती गंभीररीत्या जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.