बीड

गॅसचा स्फोट,एकजण जागीच ठार

बीड :-शिरूर तालुक्यातील खोपटी येथे (दि.३०) शनिवारी सायंकाळच्या सुमारास अंघोळीकरीता चुलीवर पाणी गरम करत असताना जवळील असलेल्या गॅस पाईप मधून गॅसची गळती होऊन अचानक गॅसचा स्फोट झाला आणि रंगनाथ एकनाथ परदेशी या ७२ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्य झाला व बाजूला उभी असलेली एक दुचाकी सुद्धा जळून खाक झाली.
अचानक घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.