NewsPopular NewsRecent NewsTrending Newsभारतमराठवाडामहाराष्ट्र

राज्यातील कीर्तनकारांना मोठा दिलासा,राज्य सरकार महिन्याकाठी देणार 5 हजारांचे मानधन

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

कोरोना काळात अडचणीत आलेल्या महाराष्ट्रातील 48 हजार कलावंतांना महिना पाच हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय घेतलेल्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने आता यात वारकरी संप्रदायाचाही समावेश केला असून वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, गायक आणि पखवाजवादक यांनाही पाच हजाराचे मानधन मिळणार आहे.वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत बैठक घेतली होती.

यात कोरोनाकाळात वारकरी संप्रदायाची दुरावस्था झाल्याचे विठ्ठल पाटील यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आणि राज्यातील कलावंतांमध्ये वारकरी संप्रदायाचा समावेश करण्याची मागणी केली.यास शासनाने सकारात्मक पाठिंबा देत वारकरी संप्रदायातील कीर्तनकार , गायक आणि पखवाजवादक याना यात समावेश करून घेण्याची घोषणा केली. आता राज्य शासनाकडून राज्यातील कीर्तनकार , गायक आणि पखवाजवादक यांचा सर्व्हे करून त्यांना कोरोना काळात पाच हजार रुपयांचे महिना मानधन मिळण्यास सुरुवात होणार आहे.

सध्या राज्यात 10 हजारापेक्षा जास्त वारकरी कीर्तनकार, गायक आणि पखवाजवादक असून या घोषणेमुळे सर्वांना कोरोना काळात महिन्याला पाच हजार रुपये मानधनाचा फायदा होऊ शकणार आहे. याच सोबत राज्यातील पारंपरिक वारकरी फड प्रमुखाला कायमस्वरूपी मानधन देण्याची घोषणा देखील या बैठकीत करण्यात आली असून संत विद्यापीठासह इतर मागण्या देखील राज्य सरकारने तत्वतः मान्य केल्याचे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सांगितले आहे.