NewsPopular NewsRecent NewsTrending Newsभारतमहाराष्ट्रराजकारण

राणे यांचं पुन्हा एक खळबळजनक वक्तव्य…!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नारायण राणे यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर निशाणा साधला. ‘येत्या 9 ऑक्टोंबर रोजी चीपी विमानतळावरून विमान वाहतूक सुरू होणार आहे. गेल्या 7 वर्षांपासून विमानतळ बाधून तयार होते. आज सकाळी ज्योतिरादित्य सिंधिया यांना भेटलो त्यावेळी हा निर्णय झाला आहे’, अशी माहिती राणेंनी दिली.तसंच, सिंधुदुर्ग ते मुंबई विमान सेवा सुरू होणार आहे. स्थानिक असल्यामुळे हे विमानतळ बांधले आहे. त्यामुळे असं काही नाही की, उद्घाटनला फक्त मुख्यमंत्री पाहिजे म्हणून अमुक एक व्यक्ती पाहिजे, असं म्हणत राणेंनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे.तसंच, कोकणात कोणता एक प्रकल्प जाहीर केला आहे, हे शिवसेनेने सांगावे. मुळात शिवसेना कुठलेच काम करीत नाही ते फक्त कामं बंद करण्याचे काम करीत असतात.

आणि जे आमच्यावर दगड मारतात त्यांचा सत्कार करतात, हे कसले मुख्यमंत्री आहे, असा टोलाही राणेंनी लगावला.तसंच, ठाकरे सरकारने हिंदू सणांवर बंदी आणण्याचे काम केले आहे. गणेशउत्सवात अनेक बंधनं घातली आहे मुळात मुर्तीची उंची वाढल्याने कोरोना वाढतो का ? यांचे उत्तर आहे का? असा सवालही राणेंनी विचारला.दरम्यान, 7 ऑक्टोबरला चिपी विमानतळाचे उद्घाटन करावे या संबंधी तयारी करण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना देण्यात आले आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकसभा खासदार विनायक राऊत यांनी भेट घेऊन निवेदन दिले. सोबत परिवहन मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब तसेच शिवसेना सचिव – खासदार अनिल देसाई उपस्थित होते.