नियम मोडला अन् 5 वर्ष तुरुंगात झाला ‘क्वारंटाईन’
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
कोरोना विषाणुच्या तिसऱ्या लाटेचा फटका जगांतील अनेक देशांना बसला आहे.त्यामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी कठोर नियम लागु केले आहेत.व्हियेतनाम या देशाने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपायांची जगभरात चर्चा झाली होती. त्यातच आता व्हिएतनाम पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न केल्याने व्हिएतनाममधील एका व्यक्तीला तब्बल ५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.कोरोना हा संसर्गाने पसरणारा रोग असल्याने संसर्ग रोखण्यासाठी सगळीकडे वेगवेगळे नियम लागू केल्याचे दिसून आले.
मात्र अनेक ठिकाणी या नियमांचे पालन होत नाही. व्हिएतनाममध्ये कठोर नियम लागू केले आहेत. ‘लेन वान तरि’ नामक एका २८ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूचा प्रसार केल्याच्या आरोपाखाली अटक केली गेली. क्वॉरंटाईन केलेल्या काळात तरि यांनी ‘का मौ’ शहरापासून ‘हो चि मिन्ह’ शहरापर्यंत प्रवास केला होता. त्यांच्यामुळे ८ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला. व्हिएतनाम वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाने या व्यक्तीला ५ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा करण्यात आली आहे. का मौ हे व्हिएतनामच्या उत्तरेकडील शहर असून, या शहरात कोरोना महामारी सुरु झाल्यापासून फक्त १९१ कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.