“या” गावात कोणीही साजरा केला नाही पोळा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
सोमवारी पोळा सणासाठी एरंडोल तालुक्यातील खर्ची गावातील अनेक तरुण बैलांना अंघोळ धुण्यासाठी धरणावर गेले होते. ग्रामस्थांसोबत सागर माळी हा सुध्दा एकदाच घरचे बैल धुण्यासाठी गेला होता. बैलांची अंघोळ झाल्यानंतर सागर धरणात पोहायला लागला. या ठिकाणी चिखलात पाय रुतल्याने तो बुडाला.हा प्रकार लक्षात आल्यानंतर काही लोकांनी त्याला बाहेर काढून तातडीने उपचारासाठी जळगावात आणण्याचा प्रयत्न केला. वाटेत छाती, पोट दाबुन पाणी बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला. शहरात पोहचेपर्यंत सागरचा श्वासोच्छवास सुरू होता. खोटेनगर स्टॉपजवळ आल्यावर त्याची प्राणज्योत मालावली.
यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले.सागरच्या पश्चात वडील ज्ञानेश्वर दोधू माळी, आई गंगाबाई, बहिण भावना, भाऊ निर्मल असा परिवार आहे. आठवीच्या वर्गात शिकणारा सागर घरातील मोठा मुलगा होता. या घटनेनंतर खर्ची गावात शोककळा परसली. कोणीही सण साजरा केला नाह