बीड

केजमधील २ रुग्ण कोरोनमुक्त तर बीडमधील ८ रुग्णांना आज मिळणार डिस्चार्ज

देशभरात झपाट्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावा मधून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. निश्चितच ही गोष्ट प्रत्येकाच्या मनाला आनंद पोहचवणारी आहे.केज तालुक्यामधील कोरोनामुक्त झालेल्या आणखी दोन रुग्णांना आज (दि.30) सायंकाळी रुग्णालयातून सुटी मिळणार आहे आणि बीडमधील ८ रुग्णांना आज संध्याकाळी उशिरापर्यंत डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली आहे.
घाबरू नका,प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा,घरात रहा,काळजी घ्या