NewsRecent NewsTrending Newsभारतमहाराष्ट्र

‘या’ कारणावरून शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाना

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिकाला योग्य दर मिळत नसल्याने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पिकाला योग्य दर मिळत नसल्याने पीक रस्त्यावर फेकून देण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.एकीकडे ओला-सुका दुष्काळ,महागाई यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तर दुसरीकडे, शेतीतील पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढल आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.ते म्हणाले की, “माझ्याकडे 10 वर्ष कृषी खात होतं, पण शेतकऱ्यांवर कधीही वेळ आली नाही. आमच सरकार असताना शेतकऱ्यांना योग्य भाव देत होतो. मात्र सध्याचे केंद्र सरकार याकडे लक्ष देत नसल्याचा आरोपही पवारांनी यावेळी केला.

ते आज सहकार महर्षी माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव महादेव तथा दादासाहेब काळे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमादरम्यान बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते. शरद पवार पुढे म्हणाले की, पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने तोडणीचा खर्चही निघत नाहीये, यामुळे शेतकरी आपले पीक रस्त्यावर फेकून देत आहेत. केंद्र सरकार याकडे लक्ष देत नसल्याने शेतमालाच्या किंमती घसरताना दिसत आहे. माझ्याकडे कृषी खातं असताना मी वैयक्तिक याकडे लक्ष द्यायचो. कारण शेतकरी संपूर्ण देशाची भूक भागवत असून जगालाही अन्नधान्य पुरवू शकतो असेही ते यावेळी म्हणाले.