Popular News

सुप्रसिद्ध ज्येष्ठ गीतकाराचे निधन…

एकाहून एक सरस गाणी देणारे ज्येष्ठ गीतकार योगेश गौर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. वयाच्या १६ व्या वर्षी लखनऊवरून मुंबईत आलेल्या योगेश यांनी एका सिनेमासाठी गाणं लिहिलं होतं. यानंतर ऋषीकेश मुखर्जी यांनी त्यांना आनंद सिनेमासाठी गाणं लिहिण्याची संधी दिली. या सिनेमात गुलझार यांनी ‘मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने लिखा’ तर योगेय यांनी ‘कहीं दूर जब दिन ढल जाए’ आणि ‘जिंदगी कैसी है पहेली हाय’ ही गाणी लिहिली. यानंतर मिली सिनेमातील ‘आए तुम याद मुझे’, छोटी सी बात सिनेमातील ‘न जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ’, रजनीगंधा सिनेमातील ‘कई बार यूं भी देखा है’ या गाण्यांशिवाय ‘रिमझिम गिरे सावन सुलग-सुलग जाए मन’, ‘न बोले तुम न मैंने कुछ कहा’, ‘बड़ी सूनी-सूनी है’, ‘जिंदगी ये जिंदगी’ अशी अनेक ७० च्या दशकातील नावाजलेली सुपर हिट गाणी योगेश यांनी लिहिली.
योगेश गौर यांनी एक रात, मिली, छोटी सी बात, आनंद, आजा मेरी जान, मंजिलें और भी हैं, बातों-बातों में, रजनीगंधा, मंजिल, आनंद महल, प्रियतमा, मजाक, दिललगी, अपने पराए, किराएदार, हनीमून, चोर और चांद, बेवफा सनम, जीना यहां, लाखों की बात अशा सिनेमांसाठी गाणी लिहिली होती.
योगेश गौर यांच्या निधनानंतर हिंदी चित्रपटसृष्टी दुःखात असून अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे