सावधान..! राज्यात ‘या’ जिल्ह्यात पुढील ५ दिवस आतिमुसळधार पाऊस
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर सातत्याने सुरु आहे.साधारण ११० टक्के पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सप्टेंबरमध्ये पावसाची सरासरी १७० मिलीमीटर आहे. ऑगस्ट महिन्यात दरवर्षीच्या तुलनेत २४ टक्के कमी पाऊस पडला आहे. पण सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यात यापुर्वी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे, नुकसान झाले तसेच पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.राज्यात पुढील ४-५ दिवसात महाराष्ट्रात पावसाची वाढ अपेक्षित आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.शेवटच्या दिवसांत सर्वात जास्त पाऊस मुंबई,ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पडेल असे देखील हवामान खात्याने सांगितले आहे.कोकणच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच मराठवाड्यातील लातूर,परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.तर धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, बीड, औरंगाबाद, जालना,यवतमाळ,वर्धा,नागपूर,चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पुढील तीन ते चार तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
येत्या ५ दिवसांत हवामानात बदल पाहायला मिळणार असून, मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे, दरम्यान, मागच्या काही दिवसांत झालेल्या पावसाने राज्यातील धरणांची पातळी वाढली आहे.पावसाने अनेक ठिकाणी शेतीचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसाने झाले आहे.सध्या बंगालच्या उपसागरात पश्चिम-मध्य आणि वायव्य भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत असून ते दक्षिण ओडिशापासून उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीपर्यंत आहे.तर उत्तरेकडे मॉन्सूनची आस असलेला कमी दाबाचा पट्टा हा पुढील ४८ तासांमध्ये दक्षिणेकडे प्रवास करेल. परिणामी राज्यातील विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.असे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.