NewsPopular NewsRecent NewsTrending Newsभारतमहाराष्ट्रराजकारण

मंदिरं उघडण्याबद्दल तारतम्य बाळगा,शरद पवार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

‘कोविडबद्दल केंद्र सरकारने राज्य सरकारला काही नियमावली दिली आहे.आणखी काही दिवस खबरदारी घ्यायची गरज आहे’.कोरोनाची लाट ओसरली असल्यामुळे सर्वत्र बाजारपेठा खुला करण्यात आल्या आहे. राजकीय सभा आणि रॅली सुद्धा सुरू आहे. त्यामुळे मंदिरं सुद्धा उघडण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे. पण, केंद्र सरकारनेच कोविडसाठी नियमावली दिली आहे, त्यामुळे विरोधकांनी तारतम्य बाळगावे, असा सल्लावजा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.पुण्यात शरद पवारांच्या हस्ते कर्वेनगरमधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूलच्या कोनशिलेचं अनावरण करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी मंदिरं उघडण्याच्या मागणीवर आपली बाजू मांडली.’मंदिरं उघडण्याची भाजप मागणी करत आहे. आंदोलनं करत आहे पण विरोधकांनी याबाबत तारतम्य बाळगण्याची आवश्यकता आहे’ असा सल्लावजा टोला पवारांनी लगावला.